टीम AM : राज्यातील शाळांनी शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे निकाल अडवून ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश, शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
काही शाळांनी शुल्क वसुलीचा तगादा लावला असून, शुल्क न भरल्यास निकाल देणार नाही, तसंच पुढील वर्गात प्रवेशही मिळणार नाही, अशी भीती दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना हे निर्देश देत, पुढील वर्गातील प्रवेशही रोखू नयेत, असं सांगितलं आहे.