टीम AM : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता आज (16 एप्रिल) आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. लारा दत्ता आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली, तरी एकेकाळी तिने एकामागून एक सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. अभिनयाची पार्श्वभूमी नसताना देखील लारा दत्ताने बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. वयाच्या 45 व्या वर्षी आजही ती खूप फिट आहे.
लारा दत्तने केवळ भारतातच नाही तर जगभरात आपले नाव कमावले आहे. 2000 मध्ये लारा दत्तने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आणि तेव्हापासून आजतागायत ती नेहमीच चर्चेत असते.
लारा दत्ताचे वडील एलके दत्ता वायुसेना अधिकारी होते. लारा दत्ता 1997 मध्ये पहिल्यांदा मिस इंटरकॉन्टिनेंटल म्हणून निवडली गेली. यानंतर 2000 मध्ये तिला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला. लारा दत्तने ‘अंदाज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा होते. या चित्रपटात लारा दत्तला तिच्या ग्लॅमरस लूकसाठी खूप पसंत केले गेले. लारा दत्ताने अनेक सुपरहिट चित्रपट दिले, ज्यात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
लारा दत्तच्या डेटिंग लाईफची सुरुवात भुतानी अभिनेता केली सोबत झाली. लारा दत्तने केली दोर्जीला 9 वर्षे डेट केले. मात्र, इतके दिवस एकत्र राहिल्यानंतर अचानक त्यांचे मार्ग वेगळे झाले. यानंतर लारा दत्ताच्या आयुष्यात डिनो मोरियाची एन्ट्री झाली. त्यांच्या प्रेमाची चर्चाही बराच काळ सुरू राहिली. मात्र, काही वर्षांनी त्यांचे मार्गही वेगळे झाले. दरम्यान, लारा दत्ताची भेट महेश भूपतीशी झाली. लारा दत्ता आणि महेश भूपती यांची पहिली भेट प्रत्यक्षात कामाच्या संदर्भात झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एक बिझनेस मीटिंग होती.
पहिल्याच भेटीत लाराला महेशचा साधेपणा खूप आवडला. त्यांनतर दोघांच्या वरचेवर भेटीगाठी होऊ लागल्या आणि त्यांची छान मैत्री जमली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे दोघे जेव्हा डेट करत होते तेव्हा महेशचे लग्न झाले होते. लारा दत्ताच्या प्रेमात पडल्यावर महेशने पहिले लग्न मोडले. यानंतर अमेरिकेत एका कँडल लाईट डिनरदरम्यान महेशने लारा दत्ताला प्रपोज केले. त्यावेळी महेशने लाराला जी अंगठी घातली होती, ती त्याने स्वत: डिझाईन केली होती, असे म्हटले जाते.