टीम AM : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन तपासणी यापुढे स्वयंचलित पद्धतीनं करण्यात येणार असून यानंतर वाहनांना योग्यतेचं प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
यासाठी राज्यभरात 23 स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणपत्र केंद्रे सुरू होणार आहेत. राज्य सरकारने यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा आदेशही काढण्यात आला आहे.
प्रत्येक ‘आरटीओ’ कार्यालयात ही केंद्रं मार्च 2024 अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.