टीम AM : राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी 14 ते 20 मार्च या कालावधीत संप केलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बाराशे कोटी रुपयांची कपात केली जाणार आहे.
तसंच संपकाळाचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आदेशात बदल करण्यासाठी विनंतीपत्र दिले असून ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.