अभिनेत्री कंगना रणौतचा वाढदिवस : जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

टीम AM : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच वरचढ ठरते. नेहमीच तिच्या वक्तव्याची चर्चा असते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मते मांडताना दिसते. बराच वेळा तिला या सर्वामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र कंगना याकडे दुर्लक्ष करते. आज 23 मार्च रोजी कंगनाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

कंगनाने 2006 साली प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ती 2008 साली ‘फॅशन’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. त्यानंतर कंगनाने कधीही मागे वळून पाहिले नाही. मात्र, आता पर्यंतच्या प्रवासात तिचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडण्यात आले.

करिअरच्या सुरुवातील कंगना आदित्य पांचोलीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. त्यावेळी आदित्यचे लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले होती. नंतर कंगना अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 2010 मध्ये अजय देवगणचे नाव कंगनाशी जोडले गेले. ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ या चित्रपटाच्या वेळी त्यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे म्हटले जात होते.

कंगनाचं सर्वाधिक गाजलेलं अफेअर म्हणजे अभिनेता हृतिक रोशनसोबतचं. ते दोघे बराच वेळ एकमेकांना डेट करत होते. इतकच काय तर ते दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. हृतिक सुझानला घटस्फोट देण्याची वाट पाहात होता. काही दिवसांनंतर त्यांच्यात खटके उडू लागले आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला.

कामाविषयी बोलायचे झाले तर कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये 25 जून 1975 रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत.