मुंबई : एकीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत होता. त्यातच आता नव्या संसर्गाबरोबर कोरोनाच्या रूग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रात सर्दी, ताप आणि खोकला या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका दिवसात 600 हून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. या दरम्यान लोक सर्दी आणि घसादुखीच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात पोहोचत आहेत. तर H3N2 आणि कोरोना यांच्यातील लक्षणे समान असल्यामुळे लोकांना हे कळू शकत नाही की त्यांना कोरोनाची लागण की H3N2 ?
महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असून गेल्या आठवड्यात कर्नाटक या राज्यांमध्ये 584, केरळमध्ये 520 आणि महाराष्ट्रात 512 नवीन रुग्ण आढळले आहेत. या राज्यांमध्ये 86 टक्के नवीन प्रकरणे वाढली आहेत. त्याच वेळी, गुजरातमध्ये या कालावधीत 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर तामिळनाडूमध्ये 224 आणि तेलंगणामध्ये 197 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. इतर अनेक राज्यांमध्ये कोविडची प्रकरणे वाढत आहेत. परंतू, आठवड्याच्या शेवटी जाहीर केलेली आकडेवारी 100 पेक्षा कमी आहे. दिल्लीत गेल्या आठवड्यात 72 वरून 97 नवीन रुग्ण आढळले आहेत.
‘ही’ आहेत लक्षणे
कोरोना आणि H3N2 या नव्या विषाणूची लक्षणे सारखीच आहेत. जर तुम्हाला ताप, खोकला, घसा खवखवणे, सर्दी, स्नायू किंवा शरीर दुखणे, डोकेदुखी, थकवा, उलट्या यांसारखे आजार असल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.