अंबाजोगाई : वाढत्या महागाईच्या आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज 13 मार्च सोमवार रोजी अंबाजोगाई शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी गॅसच्या टाकीला हार घालीत चक्क चुलीवर भाकरी करत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनात महिला आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दिवसेंदिवस घरगुती, व्यावसायीक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होत आहे. यामुळे महिलांचे पूर्ण गणित कोलमडून गेले आहे. तसेच अवकाळी पावसाने देखील शेतीचे अतोनात नुकसान झाले असल्याने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या महिलांकडून आज सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महाराष्ट्र सचिव माणिक आदमाने यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
या आंदोलनात समाधान जोगदंड, राजेभाऊ आदमाने, हारून पठाण, भारत होके, अविनाश ओव्हाळ, लक्ष्मण वाघे,ॲड. वसंत हजारे, प्रकाश शिंदे, प्रकाश मस्के, अमोल आदमाने, मुजाहिद सयद, राहुल शिंदे, सुदाम कणसे, अरुण हजारे, ॲड. चंद्रशेखर निकाळजे, महिलांमध्ये रुपाबाई ओव्हाळ, जलसाबाई आदमाने, पाकिजा पठाण, नियकात पठाण, मीरा कणसे, सुरेखा गवळी, ॲड. छाया ढगे, सविता आदमाने, मीरा ठोंबरे, रमा हजारे, भाग्यश्री आदमाने, प्रतीक्षा ओव्हाळ, मोहिनी ओव्हाळ, कोमल आदमाने, आशा आदमाने यांच्यासह महिलांची मोठी उपस्थिती होती.