भारताने रचला इतिहास : ‘नाटू नाटू’ गाण्याने जिंकला ‘ऑस्कर’ पुरस्कार

टीम AM : ऑस्कर 2023 च्या धमाकेदार सोहळ्याची सुरुवात आज सकाळी झाली आहे. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा हा पुरस्कार सोहळा आहे. जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. आता या गाण्याला ऑस्कर मिळाले आहे.

भारतानं 2023 च्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावत इतिहास रचला. लॉस एंजेलिसमध्ये सुरु असलेल्या चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठीत अशा 95 व्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या तामिळ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गीताला मूळ गीताचा पुरस्कार मिळाला तर ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला.

कार्तिकी गोन्साल्व्हिस यांचं दिग्दर्शन असलेल्या या लघुपटाची निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली आहे. एक दाम्पत्य आणि दोन हत्ती यांच्यातल्या नात्याची गोष्ट यात दाखवण्यात आली आहे. ‘ऑस्कर’ पुरस्काराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आरआरआर’ आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ च्या सर्व कलाकारांचं अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे.