सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मोठा दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाबाबत मोठा निर्णय दिला आहे. यापुढे केंद्र सरकारकडून थेट निवडणूक मुख्य आयुक्तांची नियुक्ती करता येणार नाही.
सुप्रीम कोर्टाने थेट सरकारद्वारे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती अवैध ठरवली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारला थेट मुख्य निवडणूक नियुक्ती करता येणार नाही. यापुढे समिती स्थापन करुन ही निवड केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश देताना म्हटले आहे की, यापुढे समिती गठीत करुन निर्णय घेतला जावा. पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सीजीआय यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतील.