अधीर मन झाले…मराठी चित्रपटांच्या इतिहासात सर्वात जास्त पसंत केलं गेलेलं गाणं

टीम AM : मराठी चित्रपटांच्या इतिहासात सर्वात जास्त पसंत केलं गेलेलं, देशभरातून प्रसिध्दी मिळालेलं गाणं म्हणजे ‘अधीर मन झाले !’ आपणही हे गाणं आजपर्यंत अनेकदा ऐकलं असणार हे नक्की. आता या गाण्याविषयी नवीन माहिती समोर आली आहे. 

यूट्यूबवर फार थोड्या मराठी गाण्यांनी एक कोटी व्हृयूजचा टप्पा गाठला आहे. त्यातलं हे एक गाणं आहे. ‘नीळकंठ मास्तर’ या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटातलं हे गाणं आहे. ते गजेंद्रनंच लिहिलं आहे.

सध्या या गाण्याच्या व्हृयूजचा आकडा 20 कोटींच्या घरात पोहचला आहे. शिवाय हे एका व्हिडिओचे व्हृयूज आहेत. आणखी एका याच गाण्याच्या लिरिकल व्हिडिओने 24 मिलियन म्हणजे 2 कोटी 40 लाख व्हृयूज मिळवले आहेत. या गाण्याखाली 20 हजारहून अधिक लोकांच्या कमेंट्स आहेत. जगभरातील विविध देशांतील, प्रांतांतील लोकांवर या गाण्याने किती जादू केलीय हे त्यातून दिसतं. आजही हे गाणं तितकेच लोकप्रिय आहे.