नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी समोर आली आहे. गेेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना हे नाव निसटलं आहे.
एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि सत्तेवर असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. याबाबत ठाकरे गट आणि शिंदे गटाची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु होती. या लढाईत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे.