महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुनावणी सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवायची किंवा नाही, निकाल ठेवला राखून

नवी दिल्ली : राज्यातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवायची किंवा नाही यावरचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं राखून ठेवला आहे. 

गेल्या 3 दिवसांपासून या मुद्यावर ठाकरे गट, शिंदे गट, राज्यपाल यांच्या वतीनं विविध वकीलांनी युक्तीवाद केला. अरुणाचल प्रदेशातल्या नबाम रेबिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल महाराष्ट्राला लागू होईल, असा शिंदे गटाचा दावा आहे. तर या निकालात अनेक त्रुटी आहेत.

त्यामुळं याचा फेरविचार सात सदस्यीय घटनापीठाच्या माध्यमातून करावी, अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपल्याच बाजूनं येईल, असा दावा शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.