अंबाजोगाई : बापाची व्याख्या ऐकताच मुली – महिलांचे डोळे पानावले. निमित्त होते सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे. जिजाऊ जन्मोस्तवानिमीत्त ‘संग्राम महाराष्ट्राचा’ न्यूजचे संपादक अभिजीत लोमटे यांनी शहरातील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात दि. 6 फेब्रुवारीला महिला – मुलींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जिजाऊ वंदनाने करण्यात आली. व्याख्यानादरम्यान राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजी राजे यांच्या इतिहासाचा संदर्भ देत वक्त्यांनी संपूर्ण व्याख्यानात बाप काय असतो, तो मुलांसाठी – मुलींसाठी काय करतो, आपण बापाबद्दल किती आदर ठेवला पाहिजे, त्याच्या इब्रतीला कुठलाही तडा जाऊ नये, याकरिता मुला – मुलींनी काय करावे, असं या व्याख्यानातून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्योती विनायकराव मेटे, प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी जि. प. सदस्य राजपाल लोमटे, पत्रकार दत्तात्रय अंबेकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, तानाजी देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अमित जाजू, सय्यद नईम, सत्यप्रेम इंगळे, अविनाश निर्मळ, बालाजी शेरेकर, धर्मराज सोळंके, पांडुरंग देशमुख, अविनाश देशमुख, अमर लोमटे यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत लोमटे यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश काळे यांनी केले. उपस्थितांचे आभार गोविंद शेळके यांनी मानले.