मुंबई : अंकिता राऊत आणि तन्मय पटेकर यांचं ‘हुकमाची राणी’ हे गाणं सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. या गाण्याचे निर्माते सागर शेरेकर असून दिग्दर्शक कैलास पवार आहेत.
एनबीईई फिल्म प्रॉडक्शन या प्रोडक्शन बॅनरखाली मनीष राजगिरे आणि लॅरिसा आल्मेडा यांनी निर्मित आणि अमेय मुळेने संगीतबद्ध केलेलं हे गाणं इंद्रनील चव्हाण यांनी लिहिले आहे तर प्रमोदकुमार बारी यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
हे गाणं अलिबागमधील नयनरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. दिग्दर्शक कैलाश पवार म्हणतात, ‘हा एक सुखदायक, रोमँटिक ट्रॅक आहे, जिथे तन्मयची व्यक्तिरेखा अंकिताने साकारलेल्या व्यक्तिरेखेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अखेरीस ते दोघे प्रेमात पडले असून आनंदाने ते लग्न करतात.