अंबाजोगाई : कै. दे. बा. ग. योगेश्वरी नूतन वि. प्राथमिक विभाग मेडिकल परिसर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्षउल्हासात दिनांक 25, 27 आणि 28 जानेवारी 2023 रोजी पार पडले.
या स्नेहसंमेलनाला तीनही दिवस मान्यवरांची उपस्थिती होती. ही भाग शाळा इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत आहे. या शाळेचे विभाग प्रमुख रविंद्र ठाकूर यांच्या उत्कृष्ट नियोजनात व सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नातुन या बालगोपालांचा आनंद सादर करण्यात आला.
बुधवार दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शाळेतील पालक व लघुउद्योजक पवार व परदेशी यांच्या हस्ते आनंदनगरीचे उद्घाटन करण्यात आले. यात अनेक माता – पालक व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यात सर्वांनी विविध पदार्थ आणून त्याचे विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. येथील सर्व खाद्य पदार्थांचा विद्यार्थी पालक, शिक्षक इत्यादींनी मनमूराद आनंद घेतला.
शुक्रवार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून बक्षीस वितरण व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन संस्था सहसचिव श्रीमती गोस्वामी, गटविकास अधिकारी, श्रीमती दिवाणे डॉ. नितीन चाटे, महादेव खोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती दिवाणे यांनी मुलांच्या लेझीम व प्रात्यक्षिकांचे कौतुक करत शिक्षकांनी घेतलेल्या अपार कष्टाबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच डॉ. नितिन चाटे यांनी शाळेचे कौतुक करत या आजच्या काळातही लेझीम, घूंगरकाठी यांचे शिक्षण, स्काऊट गाईड, वाचनालय, प्रयोगशाळा या सर्व गोष्टी शाळेत जपल्या जात असल्याबद्दल विभाग प्रमुखांच्या कष्टाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. खोटे यांनी शाळेसाठी भेट स्वरूपात कांही रक्कम देवू केली.
शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता स्पर्धा परिक्षांचे बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. खूरसाळे, बीडचे शिक्षणाधिकारी कुलकर्णी, डॉ. अनिल मस्के, पालक संतोष चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. खुरसाळे यांनी पालक, विद्यार्थी यांची प्रचंड उपस्थिती व शाळेला सहकार्याबद्दल व मुलांनी विविध स्पर्धा परिक्षांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षक, शिक्षिकांचे कौतुक केले.
तसेच डॉ. मस्के यांनी मोठं व्हा, कष्ट करा हा मंत्र मुलांना देत स्वत:च्या डॉक्टर प्रवासाचे अभ्यासपुर्ण वर्णन मुलांना केले. या प्रसंगी शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी मुलांना 17 चा पाढा म्हणावयास लावून उपस्थित पालक, विद्यार्थी यांच्या विविध जबाबदा-यांची आठवण करून देत विविध किस्से सांगितले. पालक चव्हाण यांनी याच सेमी शाळेस आर्थिक सहकार्य केले. यावेळी मुख्याध्यापक नांदगावकर संमेलन प्रमुख यन्नावार, शिक्षक प्रतिनिधी आखाडे व जोशी, विद्यार्थी प्रतिनिधी आजगुंडे व उजगर, पालक, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मुंडे व्यासपीठावर होते. सुरक्षारक्षक, सेवक, माजी विद्यार्थी व पालकांचे भरघोस सहकार्य या प्रसंगी लाभले. पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.