अंबाजोगाई : ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया ॲन्ड केरॅटोरिफरॅक्टिव्ह (ISCKRS) सर्जन यांच्या तर्फे ‘आउट्स्टैन्डिंग टिचर अवॉर्ड’ या पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गोवा येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया ॲन्ड केरॅटोरिफरॅक्टिव्ह (ISCKRS) सर्जन ही संस्था देशातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एक मान्यवर संस्था असुन वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या टिचर्स् चा शोध घेऊन त्यांना हा ‘आउट्स्टैन्डिंग टिचर अवॉर्ड’ पुरस्कार देऊन सन्मानित करित असते.
यावर्षीचा हा पुरस्कार येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना जाहीर झाला असून 28 जानेवारी रोजी गोवा येथील हॉटेल मेरक्युअर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते व अखिल भारतीय नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतीश, डॉ. अनिता शर्मा, डॉ. शेट्टी, डॉ. अमरीश दरक यांच्यासह इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे. सदरिल ‘आउट्स्टैन्डिंग टिचर अवॉर्ड’ हा पुरस्कार डॉ. भास्कर खैरे यांना मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.