आपल्या मनात कोणतीही खदखद नाही : पंकजा मुंडे

बीड : आपण भारतीय जनता पक्षाच्या संस्कारात वाढलेलो असून, आपल्या मनात कोणतीही खदखद नाही, असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं त्या काल वार्ताहरांशी बोलत होत्या. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यात झालेल्या दोन कार्यक्रमांना मुंडे उपस्थित राहील्या नव्हत्या.

त्यावर मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्या उत्तर देत होत्या. पक्ष संघटनेचे नियम आपण पाळतो, कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाबाहेरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं बंधनकारक नाही, असंही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.