‘ईडी’ मार्फत खा. शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ‘ईडी’ मार्फत गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज दि. 26 सप्टेंबर गुरूवार रोजी अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करत शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणटले आहे की, गेल्या दोन दिवसापुर्वी राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा संदर्भात ‘ईडी’ या शासनाच्या आखत्यारीत्यातील असणाऱ्या विभागाकडुन देशाचे नेते खा.शरदचंद्र पवार यांच्यावर विनाकारण राजकीय आकसा पोटी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षातील दिग्गजांनी सोडचिठ्ठी देऊनही नंतर झालेल्या शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात जो सामान्य जनतेचा व विशेष करून या महाराष्ट्रातील तरूणांईचा त्यांना मिळणारा पाठींबा पाहुन शासनातील भाजप-सेना हे पक्ष सत्तेचा दुरूपयोग करत आहेत. हे एव्हाना महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे. खरे पहाता शरद पवार या राज्य सहकारी बँकेचे कधीही संचालक नव्हते व राज्यातील दुसऱ्या कोणत्याही बँकेचे ते संचालक नव्हते. तरीही बँकेत जर काही तथाकथीत गैर कारभार झाला असेल तर संचालक नसलेले शरद पवार कसे काय दोषी? हा प्रश्न सामान्य नागरींकाना पडला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शहरातील असंख्य तरुणांनी घोषणाबाजी करत सावरकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत घोषणाबाजीने शासनाचा निषेध करत निवेदन दिले.

या आंदोलनात महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रणजीत चाचा लोमटे, जि.प.सदस्य शंकर अण्णा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाडा सोशलमिडीया सरचिटणीस रवी देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश देशमुख, अविनाश उगले, नेताजी सोळुंके, अरून जगताप, युवा नेते दत्ता सरवदे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष हमीद चौधरी, ॲड. बाळासाहेब पाटील, ॲड.कवडे, ॲड.प्रशांत शिंदे, सोशलमिडीया तालुकाध्यक्ष कैलास चव्हाण, शेख रौफ, जयसिंग लोमटे, सुहास पाटील, जनक गडकर, लक्षमण वाघमारे, रोहीत वडवणकर, वैभव कचरे, अविनाश जगताप, दिग्विजय लोमटे, विजय पवार, शेख आमेर मुनवर, शेख अर्शद, रणजित मोरे, गोविंद टेकाळे, शंतनु चव्हाण, माजी सरपंच कुंबेफळ प्रमोद भोसले, विजय पवार, प्रमोद गंगाधर भोसले, वैभव लोमटे, युवराज माने, रवी लोमटे, शिवराज माने, अक्षय लोमटे, अभिजीत कदम, प्रनव गंगणे, बलराज कदम, गणेश गंगणे, अक्षय अवताडे, बालु लोंढाळ, सचिन पतंगे यासह असंख्य युवक उपस्थित होते.