मुंबई : राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पद भरतीला मान्यता मिळाली असून, लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर लवकरचं सकारात्मक निर्णय घेण्यात येतील.
तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोविड काळातल्या उल्लेखनीय सेवेबद्दल प्रोत्साहन भत्ता देखील लवकरच देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.