बॉक्स ऑफिस : रितेश – जिनिलीयाच्या ‘वेेेेड’ ची जादू कायम, रेकार्ड ब्रेक कमाई 

मुंबई : नव्या वर्षाची सुरूवात झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र फक्त एकच गाणं म्हणतोय ते म्हणजे ‘मला वेड लावलंय लावलंय’. अभिनेते रितेेश देशमुख आणि जिनिलीया देेशमुख यांच्या वेड या सिनेमानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

‘वेड’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून उत्तम कामगिरी करताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यानं सर्वांना वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाही. 

वेड सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 30 करोडचा टप्पा पार केला आहे. केवळ विकेंडला नाही तर विक डेजला देखील सिनेमानं बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाची एका दिवसाची कमाई पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्यात.

अभिनेता रितेश देशमुखचा वेड प्रदर्शित झाला असला तरी त्याचं प्रमोशन काही थांबलेलं नाहीये. मला वेड लागलंय या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राला तालावर नाचवलंय. याच तालावर नाचणाऱ्या प्रेक्षकांनी आठवड्याच्या शेवटी थिएटरमध्ये गर्दी करत नवा रेकॉर्ड तयार केला आहे. एका दिवसाला वेडनं 5.70 करोडची कमाई केली आहे. एका दिवसाच्या या कमाईनं सगळेच अवाक झालेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वेड या चित्रपटाच्या कमाईबाबत माहिती दिली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात विकेंडला शुक्रवारी 2.52 कोटी, शनिवारी 4.53 कोटी आणि रविवारी 5.70 कोटींचा गल्ला जमवला. तर सोमवारी या चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या चित्रपटात रितेशसोबत जिनिलीया, अशोक सराफ, शुभंकर तावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. अजय – अतुल या जोडीने या चित्रपटाला संगीत दिले आहे.