फटाक्यांच्या कारखान्याला आग : 7 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी

बार्शी : सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या पांगरी इथं फटाक्याच्या कारखान्यात आज दुपारी स्फोट होऊन आग लागली. त्यामुळे सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर दहा कामगार जखमी झाले आहेत. 

या आगीत जखमी झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारखान्यात महिला कामगारांचा जास्तीत जास्त समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं कामगारांना वाचवण्यात येत आहे. तसंच जखमींना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटात कारखाना पूर्णपणे जळाला असून आजुबाजूच्या परिसरात आग पसरली होती.