नागपूर : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याबाबत कथित अपशब्द वापरल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांचं नागपूर अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
राज्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. पाटील यांनी अध्यक्षांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल चौकशी करण्यासाठी आचरण समिती स्थापन करण्याची तरतूद ठरावात करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा भवनाबाहेर सरकारविरोधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली.