सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली मााहिती
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. 25.31 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 26.11.2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3775 संसर्गकेंद्रांमध्ये लंम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 309064 बाधित पशुधनापैकी एकूण 229659 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 21265 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 138.77 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 99.17 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले.