वाघाळा रोड : अर्धवट नालीचे काम पूर्ण करण्याची मागणी

अंबाजोगाई : शहराच्या दक्षिणेला असलेल्या वाघाळा रोडचे काम पूर्ण झाले, परंतू त्या बाजूला योगेश्वरी नगरीपर्यंत बांधलेली नाली अर्धवट बांधली असून ती पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. 

शहराच्या विस्तारीकरणात अनेक नवीन कॉलन्या व घरे वाढत आहेत. त्यामुळे रस्ता व नाली सर्वांसाठी आवश्यक आहे. अर्धवट सिमेंट नालीचे काम पूर्ण करण्याची खरी गरज आहे. सध्या सिमेंट नाली अर्धवट बांधून ठेवल्यामुळे नागरिकांच्या घराजवळ गटाराचे पाणी साचत आहे. 

त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अर्धवट बांधलेल्या नालीचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.