पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका : मुख्यमंत्री

पुणे : पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असून, पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

पुणे इथं मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करत असतात. पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसंच अधिस्वीकृती समिती लवकरच स्थापन करण्यात येईल, असं शिंदे म्हणाले. 

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी 25 लाख रुपये देण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांना स्वातंत्र्यसैनिक दिवंगत मनोहरपंत चिवटे स्मृती आरोग्य पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.