महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष‌‌‌ : आता 29 नोव्हेंबरला होणार सुनावणी

नवी दिल्ली : राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातल्या घटनापीठासमोरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता 29 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. 

आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं आहे. दोन्ही बाजूने कोणते मु्द्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहिती देखील देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 

16 आमदारांची अपात्रता यासह इतर याचिका घटनापीठासमोर सादर झाल्या आहेत. दरम्यान या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.