गुजरात : नदीवरचा झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू , बचाव कार्य सुरु

अहमदाबाद : गुजरातमधे मोरबी इथं माच्छु नदीवरचा झुलता केबल पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत, 140 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी काल रात्री घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याची पाहणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून, आजचा अहमदाबाद इथला रोड शो रद्द केला आहे. 

प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.