मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं असून, हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं आयोगाचे सह – सचिव सुनिल अवताडे यांनी सांगितलं.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, महाराष्ट्र, अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा, नागरी सेवा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासह अभियांत्रिकी, कृषी, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा आदी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.