घाटनांदूर – अंबाजोगाई रेल्वेमार्गासाठी राष्ट्रवादी सरसावली : रेल्वेमंत्री दानवे, पवारांना दिले निवेदन

अंबाजोगाई : घाटनांदूर – अंबाजोगाई रेल्वेमार्गासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली असून आज दिनांक 9 ऑक्टोबरला रविवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवेदन देत हा रेल्वेमार्ग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, गोविंद देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

घाटनांदूर – अंबाजोगाई हा रेल्वेमार्ग तयार करण्यात आल्यानंतर दळणवळणाचे उत्तम साधन सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होईल. घाटनांदूर – अंबाजोगाईचे अंतर फक्त 18 किलोमीटरचे आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांनी या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू, या आदेशावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. आपण याकामी विशेष लक्ष देऊन घाटनांदूर – अंबाजोगाई रेल्वेमार्गासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सदरिल निवेदनात करण्यात आली आहे.