नवी दिल्ली : शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज ही सुनावणी झाली. शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे अर्ज करत, धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला आहे.
याबाबत आयोगाची कार्यवाही स्थगित करण्याची मागणी ठाकरे गटानं केली होती, ही मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
दरम्यान, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी आज पूर्ण झाली. सरन्यायाधीश उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं गेले सात दिवस ही सुनावणी घेतली. मात्र या याचिकांवरचा निकाल न्यायालयानं राखीव ठेवला आहे.