सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांचा तीव्र संताप
अंबाजोगाई : ‘स्वाराती’ निवासस्थानांच्या ड्रेनेजचे पाणी क्रांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावरून वाहतूक करताना याचा त्रास या भागातील नागरिकांना होतं आहे. दरम्यान, याकडे ‘स्वाराती’ तील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने बांधकाम विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
‘स्वाराती’ परिसरातून क्रांतीनगरकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरूनचं अनेक वर्षांनी लोक ये – जा करतात. पण गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यावरून ’स्वाराती’ निवासस्थानांच्या ड्रेनेजचे पाणी वाहतं आहे. या संदर्भात ‘स्वाराती’ परिसरात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या भागातील नागरिकांनी वेळोवेळी चर्चा, तक्रारही केली आहे.
परंतू, त्याकडे या बांधकाम विभागाच्या कार्यालयाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्यांवरून वाहतं जाणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे ‘स्वाराती’ परिसरातील आणि या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर रस्त्यावर येत असलेलं ड्रेनेजचं पाणी बंद करण्यात यावे, अशी मागणी क्रांतीनगर भागातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे, नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.