अंबाजोगाई : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्य शब्दवेध पुणे निर्मित व प्रसिद्ध नाट्यकलावंत व गायक चंद्रकांत काळे यांनी संकलन व दिग्दर्शित केलेला “अपरिचित पूल” हा आगळावेगळा कार्यक्रम अंबाजोगाईत 21 सप्टेंबर रोजी पार पडला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र अंबाजोगाई, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे स्वामी रामानंद तिर्थ महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
पुलं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांच्या साहित्यातील कांही अंश, त्यांनी लिहीलेले लेख, मोजक्या पत्रांना त्यांनी लिहिलेली उत्तरे, त्यांची मिश्किल भाषा, विनोदी किस्से, हजरजवाबी बोलणे, नट, गायक, काव्य रचना, चित्रपटांची निर्मिती, संगीत नियोजन व गायक म्हणून ते सुप्रसिद्ध होते. या त्यांच्या अपूर्व लिखाण व जगण्यावर आधारित अपरिचित साहित्यावर संशोधन करून चंद्रकांत काळे यांनी हा “अपरिचित पूल” ह संगीतमय कार्यक्रम रसिकांच्या समोर आणला. सुप्रसिद्ध चित्रपट व नाट्य कलावंत नाटककार सतीश आळेकर, गजानन परांजपे व स्वतः चंद्रकांत काळे यांनी पुल यांच्या साहित्याचे वेगवेगळे विषय घेऊन तसे गद्य रुपात साभिनय वाचन करून पुलं यांच्या एकूण साहित्याला व व्यक्तिमत्वाला न्याय दिला आहे. कधी मिश्किल तर कधी गंभीर वेगवेगळे तुकडे करून त्यांनी वाचन केले. चंद्रकांत काळे यांनी पुलंच्या कवितांचे गायन केले.
तबल्यावर अक्षय व हार्मोनियंवर आदित्य मोघे. यशवंतराव चव्हाण स्मृतीचे सचिव दगडू लोमटे यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, व कोषाध्यक्ष अभिजित जोंधळे, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले, सतीश लोमटे व प्राचार्य रमेश सोनवळकर यांनी सर्व कलावंताचे स्वागत केले. रसिकांनी अत्यंत योग्य ठिकाणी योग्य दाद देऊन कार्यक्रमात रंगत आणली. नागापूरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास रसिक वर्ग मोठ्याप्रमाणावर उपस्थित होता.