राज्यातील पत्रकारांसाठी ‘बार्टी’ तर्फे ॲट्रॉसिटी कायदा विषयक कार्यशाळा

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने महाराष्ट्रातील पत्रकारांकरिता ‘अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016’ याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. 

बुधवार दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक हॉल, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंद पेठ, नागपूर 440022 येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांनी नाव नोंदणी कार्यालयीन वेळेत दि. 12 ऑगस्ट 2022 पर्यंत 8007385997 / 8275730357 या क्रमांकावर करावी, असे आवाहन ‘बार्टी’ तर्फे करण्यात आले आहे.