पंतप्रधान मोदींनी बीड जिल्ह्यातील धावपटू अविनाश साबळेंशी साधला संवाद : स्पर्धेसाठी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुभेच्छा दिल्या. इंग्लंडमध्ये बर्मिंगहम इथं 28 जुलैपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. बीड जिल्ह्यातला धावपटू अविनाश साबळे याचाही या खेळाडूंमध्ये समावेश आहे. पंतप्रधानांनी साबळे याच्याशी साधलेल्या संवादातला हा अंश…

अविनाश, नमस्कार।

जय हिंद, सर। मै अविनाश साबले. मै कॉमनवेल्थ गेम्स मे ॲथलेटीक्स मे थ्री थाऊजंड मीटर इव्हेंट मे इंडिया को रिप्रेजेंट कर रहा हूं।

अच्छा अविनाश मैने सुना है, की सेना जॉईन करने के बाद भी आपने इस ट्रीपल चेस को चुना है। सियाचीन और ट्रीपल चेस का कोई संबंध है क्या? 

हां जी सर। ट्रीपल चेस इव्हेंट मे ऑब्स्टिकल्स का गेम है। मतलब जैसे इसमे हमे हर्डल्स को उसके उपर जंप करना है। फिर वॉटर जंप करना है। इसी तरह से आर्मी की जो ट्रेनिंग होती है उसमे मे भी हमे बहोत सारे ऑब्स्टिकल्स के बीच मे से जाना पडता है। यहाँ तो मुझे ट्रीपल चेस इव्हेंट मे बहोत ज्यादा आसान लग रहा है।

धावपटू अविनाश साबळेंचा प्रवास

बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या धावपटू अविनाश साबळे याने बीडचे आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर कोरलं आहे.

अविनाशने अमेरिकेतील सॅन जुआण कॅपिस्टानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये पाच हजार मीटर शर्यतीत (US 5000 m steeplechase) धावून धावपटू बहादूर प्रसाद याने केलेला 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.

अविनाश साबळेने या आधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.

ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. अविनाश साबळे याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या धावण्याचा सराव पूर्ण केला.

मोलमजुरी करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र धावण्यातून आपल्या देशाचं नाव मोठं करण्याचं स्वप्न अविनाश पाहतोय आणि त्यासाठी तो तेवढ्याच हिमतीन सराव देखील करतोय.

अविनाश हा शेतकरी कुटुंबातील आहे. अविनाश लहानपणी 6 किलोमीटर अंतर पार करून शाळेला जात असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय. 12 वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटच्या सेवेत आहे.