महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता‌‌ 1 ऑगस्टला : शिंदे गटाला दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. शिवसेनेत बंडखोरी करणारा शिंदे गट आणि शिवसेना यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशाचं या निकालाकडे लक्ष लागले होते.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला असून आता पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील शिवसेना, बंडखोर आणि इतरांच्या याचिकांवर बुधवारी सरन्यायाधिशांसमोर सुनावणी सुरू झाली. यात सर्वच बाजूंना आपली बाजू मांडण्यासाठी पुढील बुधवारचा वेळ देण्यात आला असून याचिकेची सुनावणी आता 1 ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी कदाचित 5 सदस्यीय पिठासमोर होऊ शकते.