घाटनांदूर : तालुक्यातील घाटनांदुर येथे एका 70 वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घाटनांदूर – परळी मार्गावर असलेल्या गुरुदास सेवा आश्रमालगतच्या शिवारात एका वृद्धाने दुपारी 3 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस चौकीचे जमादार शिंदे आणि बीट अंमलदार अनिल बिक्कड हे घटनास्थळी दाखल झाले.
शिवराज सखाराम ढवळे (वय 70) असे मयताचे नाव असून ते सताळा ता. अहमदपूर जि. लातूर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे आणि बिक्कड यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केला आहे. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.