स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देणार 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहणार असल्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, अशी माहिती दिली.