महावितरण : विजेचा धक्का बसून 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जून मगर अशी या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

कन्नड तालुक्यातल्या हिवरखेडा नांदगीर वाडी इथं नवीन रोहित्र बसवण्याचं काम सुरू असताना, अज्ञात व्यक्तीने टाकलेल्या आकड्यामुळे, चालू असलेल्या कामाच्या तारेतून वीज प्रवाहित झाल्यानं, सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणी महावितरण अभियंता, ठेकेदारासह पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.