अंबाजोगाई : कबड्डी मधील राष्ट्रीय खेळाडू दिनेश हजारी यांना ‘राज्यस्तरीय जेष्ठ खेळाडू पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे तर राष्ट्रीय खेळाडू, जेष्ठ मार्गदर्शक दगडू चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ‘राज्यस्तरीय जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला, अशी माहिती राज्य कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी ॲड. अस्वाद पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या पुरस्काराचे वितरण येत्या 15 जुलैला पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय खेळाडू दिनेश हजारी आणि दगडू चव्हाण यांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धा यशस्वी घेण्यात आल्या. त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्थानिक क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.