…अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांचा राजीनामा, सोशल मीडियावर साधला जनतेशी संवाद

विधान परिषद सदस्यत्वाचाही दिला राजीनामा

मुंबई : महाराष्ट्रात ‌‌गेल्या काही दिवसांपासून सत्तेसाठी चालू असलेल्या राजकीय संघर्षाला पुर्णविराम मिळाला आहे. उध्दव ठाकरे यांनी सोशल मीडियावर ‌‌‌जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यासोबत‌ विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.‌ जनतेशी संवाद साधताना उध्दव ठाकरे भावूक झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिला. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.

‘ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं ते हिमतीने सोबत आहे, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात शिवसेना,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्यासाठी शिवसेना भवनावर येणाऱ्या समर्थकांचे आभार मानले.

‘राज्यपाल महोदयांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी लोकशहीचा मान राखलात, एक कॉपी दिल्यावर 24 तासात आदेश दिला,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये राज्यपालांचे आभार मानले. तसेच विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांनी मंजूर केली असती तर मान अधिक वाढला असता, असंही म्हटलं.