नगरपरिषद : 8 दिवसाला येणाऱ्या पाण्यामुळे अंबाजोगाईकरांचे‌ आरोग्य धोक्यात ? 4 ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌दिवसाला पाणी पुरवठा करा

वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

अंबाजोगाई : नगरपरिषद अंबाजोगाईतील जनतेला 8 ते 10 दिवसाला गेली कित्येक वर्षांपासून घरगुती नळाद्वारे पाणी देत आहे. या 8 ते 10 दिवसाला येणाऱ्या पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शहराला 4 दिवसाला पाणी पुरवठा करावा आणि जनतेच्या आरोग्याचे रक्षण करावे, त्यांचा जीव धोक्यात घालू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाइपलाइन दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करण्यात यावे, अशीही मागणी ‌‌निवेदनात केली आहे. यावेळी नगरपरिषदेमार्फत पाणी पुरवठा करण्यात आलेलं अस्वच्छ पाणी कार्यालयाला भेट देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देताना शहराध्यक्ष गोविंद मस्के, जिल्हा संघटक परमेश्वर जोगदंड, शहर महासचिव नितीन सरवदे, तालुका प्रसिद्धी प्रमुख सतिश सोनवणे, तालुका संघटक लखन बलाढे, भगवान वाघमारे, प्रवक्ते उमेश शिंदे, आकाश पोटभरे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.