मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे.
डिझेलवरील अबकारी करदेखील 18 रुपये 24 पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा – सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात.