विनोद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात 60 जणांनी केले रक्तदान
अंबाजोगाई : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शहरात दिनांक 14 मे ला उत्साहात साजरी करण्यात आली. संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी महाराजांना विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
तसेच बहुजन विकास मोर्चाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष विनोद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी येथील यशवंतराव चव्हाण चौक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कॉम्पलेक्स, येथे सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माकपाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. बब्रुवान पोटभरे आणि बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये अंबाजोगाई शहर व परिसरातील 60 तरुणांनी रक्तदान केले. यात प्रामुख्याने ‘बेटी बचाओ’ अभियानचे धिमंत राष्ट्रपाल, वंचित बहुजन आघाडीचे अमोल हातागळे, रवि आवाडे, सतिष क्षिरसागर, अविनाश कुऱ्हाडे, बाळाजी मिसाळ, सुरज तारे, धिरज सरवदे, गौरख कुचेकर, अतिष मंजुळे, सुरेश मिसाळ, कैलास शिंदे, आकाश आवाडे, दिलीप शिंदे, विशाल बडे, गजानन जगताप, आशिष इमडे, अविनाश गालफाडे, निकेश आचार्य, गोविंद लोमटे, विठ्ठल माळी यांच्यासह 60 तरुणांनी रक्तदान केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि आवाडे, धिरज वाघमारे, अविनाश कुऱ्हाडे, सुमित आवाडे, अतिष मंजुळे, अमोल घोत्रे, सतिष क्षीरसागर, सुरज ताटे, बालाजी मिसाळ, गौरव कुचेकर आदींसह सीहीएस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले. रक्त संकलन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.