अंबाजोगाई : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस अंबाजोगाई शहरांसह तालुक्यात ‘स्वाभिमान दिन’ म्हणून दिनांक 12 मे ला साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुक्यातील पाटोदा येथे तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांसाठी पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. तसेच निराधार गरजूंना धानोरा खुर्द आणि पाटोदा येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यकारिणीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी हजरत मौलाअली बाबा आणि हजरत किरमानी बाबा दर्गा येथे फुलांची चादर चढविण्यात आली. शहर कार्यकारिणीच्या वतीने 10 ते 18 मे दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा पुर्व अध्यक्ष शैलेश कांबळे, शहराध्यक्ष गोविंद मस्के यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील प्रभाग क्र. 11 मध्ये मंगळवार, दिनांक 10 मे 2022 रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस अमोल हतागळे यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, अक्षय भुंबे यांच्यासह लाल नगर, क्रांती नगर, आकाश नगर, आझाद नगरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.