महागाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक : अंबाजोगाईत निदर्शने

भाजप करित असलेली जनतेची लूट काँग्रेस कदापिही खपवून घेणार नाही – जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाई : जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने देशवासियांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली. आज हेच उद्योगपती धार्जिणे सरकार भारतीय जनतेची विविध कायदे आणून आर्थिक लूट करण्यात मग्न असून प्रचंड प्रमाणात झालेल्या महागाईमुळे गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बुरे दिन दाखविण्याचे काम या भाजपा सरकारने केलेले आहे.

या महागाईच्या विरोधात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न राजीव गांधी चौका नजीकच्या पेट्रोल पंपासमोर ‘महागाई जुमला, भोंगा व महागाई मुक्त भारत’ या प्रकारचे आंदोलन करण्यात आले. 

यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना भाजप करीत असलेली जनतेची लूट काँग्रेस पक्ष कदापिही खपवून घेणार नाही, महागाईच्या विरोधात व जनतेच्या हितासाठी काँग्रेस यापुढेही आक्रमकपणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिला.

भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर आकाशाला भिडले आहेत, तसेच ते दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब, ज्येष्ठ नेते गणपतराव कोरे, प्रदेश सरचिटणीस खंडेराव टेमकर, परळी शहर काँग्रेस सरचिटणीस शिवाजीराव देशमुख, बालासाहेब देशमुख, माऊली देशमुख, गुड्डू देशमुख, शिवाजी रूपनर, माजलगाव विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरदीप सोळंके, युवा नेते संतोष दौंड (परळी), दिगंबर कदम, सतिष भगत, समीर पठाण, बाळासाहेब देशमुख, मेघराज गुट्टे, बालाजी चाटे, बाबुराव शिंदे, अशोक देशमुख, अखिल शेख (परळी), किरण उबाळे (सनगाव), गणेश देशमुख, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण सोमवंशी, परमेश्वर शिंदे, पंकज देशमुख, अशोक देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेस प्रेमी जनता सहभागी झाली होती.