भीमजन्मोत्सव : तीन ऑर्केस्ट्रांनी केले विनामानधन कार्यक्रम, तीन प्राध्यापकांचा आदर्श उपक्रम

अंबाजोगाई : भीमजयंतीत बुद्ध – भीम गीतांच्या कार्यक्रमाला खूपच महत्व आहे. गायन पार्टी ते ऑर्क्रेस्ट्रा असा हा प्रबोधन गीतांचा प्रवास आहे. आजच्या काळात ऑर्केस्ट्राचे मानधन सर्वसाधारण उत्सव समितीच्या अवाक्याबाहेरची बाब आहे. पण अशा बिकट परिस्थितीतही संघर्षभूमीचे विनामानधन मॉडेल मात्र अत्यंत प्रभावी व यशस्वी ठरले आहे. या वर्षीच्या 14 दिवशीय भीमजन्मोत्सवात तीन ऑर्केस्ट्रांचे कार्यक्रम विनामानधन पार पडले आहेत. ही चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची व प्रेरणादायी बाब आहे.  

स्वरविहार : 1 एप्रिल शुक्रवारी प्रा. राजकुमार ठोके प्रस्तुत ‘स्वरविहार’ हा ऑर्केस्ट्रा सादर झाला. यात त्यांनी अनेक दर्जेदार बुद्ध – भीम गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. लेझर लाईट शो ने या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. 

वामणवाणी : 8 एप्रिल शुक्रवारी परभणी जिल्ह्यातून हा विनामानधन ऑर्केस्ट्रा आलेला होता. प्रा. भगवान गायकवाड यांनी ‘वामनवाणी’ हा लोककवी वामदादा कर्डक यांच्या गीतांवर आधारीत बुद्ध – भीम गीतांचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात सादर केला. प्रत्येक गाण्याला वेगळी व अप्रतिम चाल तसेच गीतांचे उत्तम गायन व सादरीकरण यामुळे उपस्थितांनी वेळोवेळी प्रचंड दाद दिली. 

भीमसूर्याची भीमवाणी : 10 एप्रिल रविवारी प्रा. रमेश सरवदे प्रस्तूत ‘भीमसूर्याची भीमवाणी’ हा ऑर्केस्ट्रा सादर झाला. यात तब्बल 18 गाणी सादर झाली. प्रा. रमेश सरवदे व पूणे येथील गायीका स्नेहा खंडागळे यांच्या गीतांना उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.

संघर्षभूमी येथील भीमजन्मोत्सवात हे तीनही ऑर्केस्ट्रा विनामानधन सादर करून निर्मात्यांनी व संचालकांनी सामाजिक भान जपले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संगीत क्षेत्रातील तीन उच्च शिक्षीत प्राध्यापक अर्थात प्रा. राजकुमार ठोके, प्रा. भगवान गायकवाड व प्रा. रमेश सरवदे या तिघांचे भीमजन्मोत्सव समितीच्या वतीने ॲड. शाम तांगडे, गुलाबराव गायकवाड, संजय हातागळे, डॉ गणेश सुर्यवंशी, प्रा. किर्तीराज लोणारे, पंकज भटकर, बबनराव ठोके, खंडेराव जाधव गुरुजी, बाबुराव मस्के, अनंत सरवदे, भारत सातपुते, ॲड. संदीप थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.