‘आजादी‌ का अमृत महोत्सव’ : लोखंडी सावरगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

20 एप्रिलला होणार शिबीर : विविध रोगांचे निदान व उपचार 

तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा : नियोजन कमिटीचे आवाहन

अंबाजोगाई : ‘आजादी‌ का अमृत महोत्सव’ अंतर्गत लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात दिनांक 20 एप्रिलला भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध रोगांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुकास्तरीय नियोजन कमिटीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोणसीकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबीरात भिषक शल्य चिकित्सीक, बालरोग तज्ञ, नेत्र, प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ, नाक – कान व घसा तज्ञ, दंत चिकित्सक, बधिरीकरण तज्ञ, अपंगाचे प्रमाणपत्र व इतर सर्व प्रयोगशाळा तपासणी मोफत होणार आहेत. 

तालुक्यातील गावांमधील ग्रामस्थांना वरिलपैकी कोणतेही आजार असतील तर आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सहायक, परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांची मदत घेऊन सर्वांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुकास्तरीय नियोजन कमिटीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी डॉ. घोणसीकर यांनी केले आहे.