हातोला सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील हातोला सेवा सहकारी सोसायटीवर दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने सेवा सहकारी सोसायटी ताब्यात घेतली.      

येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून 13 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. एकूण 13 उमेद्वारांपैकी 12 जागेवर दणदणीत विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सेवा सहकारी सोसायटीवर एकतर्फी विजय मिळवला. 

शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून शेषेराव गित्ते, रघुनाथ चव्हाण, राजेश्वर चव्हाण, विशाल चव्हाण, सुंदर चव्हाण, सुनिल चव्हाण, बिभीषण शेळके,  लक्ष्मण दासूद, रुक्मिणी चव्हाण, जयश्री लोमटे, वैजनाथ खतीले, भास्कर गित्ते या बारा उमेदवारांना  जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले तर भाजपा प्रणित पॅनलमधील 13 उमेदवारांपैकी अ‍ॅड. जयसिंग चव्हाण हे एकमेव उमेदवार निवडून आले.       

पालकमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच शेतकरी विकास पॅनल प्रमुख मधुकर चव्हाण, अ‍ॅड. विश्वनाथ चव्हाण, रामभाऊ गित्ते, परमेश्वर चव्हाण, भारत चव्हाण, प्रदीप चव्हाण, लालासाहेब कदम, राहुल चव्हाण यांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.