अंबाजोगाई : येथील ‘लिनेस क्लब’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मासिक बैठकीत सौर ऊर्जा व संगणक प्रणाली संबंधिची विस्तृत माहिती देण्यात आली. ‘लिनेस क्लब’ च्या सदस्या दिपा गुप्ता यांच्या निवासस्थानी ही मासिक बैठक घेण्यात आली.
या बैठकीत महिला सदस्यांना ‘सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग याबद्दलची उपयुक्त माहिती ‘लिनेस क्लब’ च्या उपाध्यक्षा इंदू पल्लेवार यांनी दिली. यानंतर आजच्या या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचे महत्व वाढले असल्याने ‘कॉम्प्युटर आणि इंटरनेट प्रणाली तसेच मोबाईल या उपकरणांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक’ रचना परदेशी हिने केले.
कार्यक्रमाचा वार्षिक स्थायी उपक्रम राबवत क्लबच्या क्षेत्रीय संयोजिका लि. कमल बरुळे आणि लि. दीपा गुप्ता यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतलेल्या मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यावेळी लि. कमल बरुळे, अध्यक्षा लि. वनमाला रेड्डी, सचिव लि. ज्योती परदेशी, कोषाध्यक्षा लि. सुनीता धायगुडे, लि. इंदू पल्लेवार, लि. प्रभावती अवचार, लि. मंदा काळम, लि. उर्मिला रापतवार, लि. कापसे, लि. प्रीती साहू, लि. श्वेता गुप्ता यासह आदी महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लि. कमल बरुळे तर आभार लि. सुनिता धायगुडे यांनी मानले.