अंबाजोगाईत भरदिवसा चोरी : सराफाची दागिन्यांसह स्कूटी घेऊन चोरटे फरार

अंबाजोगाई : शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या असून चोरट्यांनी पोलीसांसमोर आव्हानं उभं केलं आहे. शहरात भरदिवसा चोरट्यांनी सराफाला लाखोंचा गंडा घालत दागिन्यांसह स्कूटी घेऊन फरार झाले. ही घटना आज दिनांक 7 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास घडली. भरदिवसा ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

या बाबत ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्राप्त माहिती अशी की, शहरातील गुरूवार पेठ भागामध्ये राठोड ज्वेलर्स नावाने राहुल राठोड यांचे सोन्याचे दुकान आहे. आज सकाळी दहा वाजता घरातुन येवून राठोड दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप उघडू लागले. मात्र, शटरच्या कुलपामध्ये कोणीतरी फेविक्विक व खडे टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी कुलूप उघण्यासाठी  चावी बनवणाऱ्या कारागिराकडे धाव घेतली. राठोड यांनी ‌प्लेजर स्कुटीच्या डिक्कीमध्ये सोने – चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम ठेवलेली होती.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात अत्यंत ‌‌वर्दळीच्या ठिकाणी राठोड यांनी स्कुटी लावून चावी बनवणाऱ्या कारागीराला बोलत ‌‌‌‌‌असतानाच कोणीतरी अज्ञात तरुणाने डुप्लिकेट चावी लावून स्कुटी घेऊन फरार झाला. स्कुटीच्या डिक्कीत सोने ‌- चांदीचे दागिने, नगदी रक्कम, दुकानातील व्यवहाराची डायरी होती.

या घटनेमुळे राहुल ‌राठोड यांना ‌लाखोंचा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌भुर्दंड झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.